breaking-newsराष्ट्रिय

निवडणूक डयुटीवरील तीन अधिकाऱ्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मध्य प्रदेशात निवडणूक डयुटीवर तैनात असलेल्या तीन निवडणूक अधिकाऱ्यांचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. हे अधिकारी मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असताना ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. गुणा जिल्ह्यामध्ये एकाचा तर इंदूरमध्ये अन्य दोघांचा मृत्यू झाला.

ANI

@ANI

Election Commission announces Rs 10 lakh each compensation for the kin of the EC officials who passed away while on election duty

ANI

@ANI

One Election Commission official in Guna, and two in Indore have passed away due to cardiac arrest #MadhyaPradeshElections

42 people are talking about this

मध्य प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. राज्यातील सर्वच्या सर्व २३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सोहन लाल असे एका मृत अधिकाऱ्याचे नाव असून मतदान केंद्रावरील रांगेचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. निवडणूक आयोगाने मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

२३० विधानसभा जागांसाठी २८९९ उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये २६४४ पुरुष, २५० महिला आणि ५ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. २२७ विधानसभा मतदारसंघात सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. तर बालाघाट जिल्ह्यातील तीन नक्षलप्रभावित विधानसभा मतदारसंघातील परसवाडा, बेहर आणि लांजी येथे सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान होणार आहे. चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून कसून प्रयत्न केले जात आहेत. तर काँग्रेसला राज्यातील मागील १५ वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button