breaking-newsराष्ट्रिय

पत्रकार शुजात बुखारींची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा चकमकीत खात्मा

जम्मू- काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात सामील असलेल्या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी चकमकीत खात्मा केला आहे. नावीद जट्ट असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानचा आहे. अबू हंजाला उर्फ नावीद जट्ट हा काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमधील रुग्णालयातून पळाला होता.तो लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेत सक्रीय होता.

शुजात बुखारींची जून महिन्यात ईदच्या दोन दिवस अगोदर हत्या झाली होती. ‘प्रेस एनक्लेव’ या वृत्तपत्राच्या कार्यालयातील काम आटपून कारमध्ये बसत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बुखारींची हत्या करणारे तीन पैकी दोन मारेकरी हे दक्षिण काश्मीरचे तर तिसरा मारेकरी हा पाकिस्तानचा असल्याची माहिती जम्मू- काश्मीर पोलिसांच्या तपासातून समोर आली होती. या दहशतवाद्याचे नाव अबू हंजाला उर्फ नावीद जट्ट असे होते. त्याला २६ ऑगस्ट २०१४ रोजी अटक झाली होती. मात्र, जानेवारीत श्रीनगरमधील रुग्णालयातून पळाला होता.

बुधवारी सकाळी बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. चकमकीत खात्मा झालेला दहशतवादी नावीद भट्ट असून तो लष्कर- ए- तोयबाचा टॉप कमांडर होता. त्याला ठार मारल्याने भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे सांगितले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button