breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लातूर-नांदेड मार्गावर अपघात, महिलेसह मुलाचा मृत्यू, तर एकजण गंभीर

लातूर | महाईन्यूज

मराठवाड्यातील लातूर-नांदेड राज्यमार्गावर भातखेडा परिसरात भरधाव ट्रकची दुचाकीला जोरात धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये एक महिला व एक मुलाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औसा तालूक्यातील मौजे सेलू येथील अबुतअली महेबुब शेख हा आपली आई लैलाबी महेबूब शेख (58) त्यांचा नातू अय्यार नबी शेख (7) यांना सोबत घेऊन शिवणखेड येथे दुचाकीवर (एमएच 24, एई 8599) निघाला होता. त्यावेळी एक भरधाव ट्रक (एमएम 24 एडी 1807) नांदेडकडे जात होता. दरम्यान, ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरात धडक बसली. यात लैलाबी महेबूब शेख आणि अय्यार नबी शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अबुतअली महेबुब शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button