आजपासून आषाढी वारीचा सोहळा सुरू होत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरातले वारकरी विठू नामाचा गजर करत सोहळ्यात दाखल झाले आहेत. 2 / 7 आषाढी वारीसाठी संतजन व्याकुळ झाले आहेत. पंढरीच्या विठुरायाची ओढ त्यांना लागली आहे. 3 / 7 या ओढीनेच लाखो भाविक संतांच्या पालखीत सहभागी होण्यासाठी देहूत दाखल झाले आहेत. 4 / 7 आज श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्थान होणार आहे. 5 / 7 सेल्फी काढताना वारकरी 6 / 7 सोहळ्यात सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. 7 / 7 प्लास्टिकबंदी नंतरची ही पहिलीच वारी आहे. त्यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनीही प्लास्टिकला पर्याय म्हणून वेगवेगळ्या वस्तूंची जोड घेतली आहे.