breaking-newsआंतरराष्टीय

अमिरातीमध्ये भारतीय नागरिकाला 1.9 दशलक्ष डॉलरची लॉटरी

दुबई – संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये दरमहिन्याला होणाऱ्या सोडतीमध्ये भारतीय नागरिकाला तब्बल 1.9 दशलक्ष डॉलरची लॉटरी लागली आहे. “युएई’मध्ये राहण्यापेक्षा भारतात जाऊन अधिक चांगले उत्पन्न शोधण्यासाठी देश सोडण्याच्या तयारीत असतानाच त्याला ही लॉटरी लागली आहे. टोजो मॅथ्यू असे 30 वर्षीय भाग्यवानाचे नाव असून तो बांधकाम सुपरवायजर म्हणून अबुधाबीत कार्यरत आहे. भारतात येण्यासाठी दुबईतील विमानतळावर गेला असता तेथेच त्याने हे तिकीट खरेदी केले होते.

मॅथ्यू मूळचा केरळचा रहिवासी असून त्याच्या पत्नीला दिल्लीत नोकरी लागली आहे. पत्नीबरोबर राहण्यासाठी युएईला रामराम ठोकण्याच्या तयारीत होता. भारतात परतण्यासाठी 24 जूनला विमानाचे तिकीटही त्याने काढले होते. पण विमानात बसण्यापूर्वीच ही आनंदाची वार्ता त्याला समजली. त्याने या लॉटरीद्वारे 7 दशलक्ष दिराम (1.9 दशलक्ष डॉलर) इतकी रक्कम जिंकली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button