breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तामिळनाडूत शाळा, कॉलेज सुरू करण्यास राज्य सरकारची मंजुरी

चेन्नई – लॉकडाऊन शिथिल करताना तामिळनाडू सरकारने आता नोव्हेंबरमध्ये शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, करमणूक पार्क आणि गार्डन खुली करण्यास मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून ते सुरू करता येतील, असे सरकारने जाहीर केले आहे.

तामिळनाडू सरकारने यापूर्वी १ ऑक्टोबरपासून १०वी ते १२वीचे ऐच्छिक वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु कोरोनाचे संकट वाढल्यामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता. मात्र आता १६ नोव्हेंबरपासून ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूतील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था सुरू होतील, असे राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी म्हटले आहे. याशिवाय १० नोव्हेंबरपासून राज्यातील सिनेमागृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स, गार्डन, प्राणी संग्रहालय आणि मनोरंजन पार्क सुरू होतील. मात्र ते कोरोनाचा नियम पाळून ५० टक्के क्षमतेने चालवावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच स्विमिंग पूल आणि पर्यटन स्थळे अद्याप बंद आहेत. मात्र २ नोव्हेंबरपासून घाऊक फळविक्रीला सरकारने परवानगी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button