breaking-newsमुंबई

लता मंगेशकर राहतात ती प्रभुकुंज सोसायटी कोरोनामुळे सील

मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी मुंबई महापालिकेने सील केली आहे. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहिण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीदेखील वास्तव्यास आहेत. त्यामुळे सोसायटीतील सर्व रहिवाशांच्या एकमताने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. ‘आम्हाला आज संध्याकाळपासून प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. प्रभुकुंज सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयस्कर रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणे जरुरीचे आहे’, असे मंगेशकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button