breaking-newsपुणे

पुण्यात शनिवारी तब्बल ४,०७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा १६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्ण संख्येचा आकडा आता ७ लाख ६४ हजार २८१वर पोहोचला आहे. हा आकडा चिंता वाढवणारा आहे. राज्यात शनिवारी कोरोनाचे तब्बल १६ हजार ८६७ नवे रुग्ण आढळले. तर ३२८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात ११ हजार ५४१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह राज्यात कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ७ लाख ६४ हजार २८१चा टप्पा ओलांडला आहे. यापैकी ५ लाख ५४ हजार ७११ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून २४ हजार १०३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील विविध रुग्णालयांत १ लाख ८५ हजार १३१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत शनिवारी दिवसभरात १ हजार ४३२ नवे रुग्ण आढळले, तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४३ हजार ३८९वर पोहोचली आहे. तसेच शनिवारी दिवसभरात ६८२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आतापर्यंत मुंबईत एकूण १ लाख १५ हजार ५०० रुग्णांना कोरोनावर मात करण्यात यश आले आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या पावणेसह महिन्यांच्या कालावधीत शनिवारी पहिल्यांदाच एका दिवसातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पार गेला. पुण्यात काल दिवसभरात तब्बल ४ हजार ७० नवे रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील १ हजार ९६८ रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात ७३ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६४ हजार ५२५वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा ४ हजार १० इतका झाला असून आतापर्यंत १ लाख २६ हजार ९४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button