breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे सभापती सुमित्रा महाजन यांचे हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली – खासदार श्रीरंग बारणे यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकाचे प्रकाशन काल गुरुवार दि.३ जानेवारी २०१९ रोजी दिल्ली येथे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना गटनेते आनंदराव अडसूळ, तेलंगना राष्ट्रसमिती पक्षाचे नेते जितेंद्र रेड्डी, विविध राज्यातील पक्षाचे खासदार तसेच महाराष्ट्रातील खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग  बारणे यांच्या संसदेच्या अनुभवा विषयी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले.

श्रीरंग बारणे यांनी संसदीय कामकाजाची इथंभूथ माहिती असलेले व त्यांना आलेले संसदेतील कामकाजाचे अनुभव त्यांनी गेल्या साडे चार वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेले कामकाजाच्या पाठपुराव्याविषयी इथंभूथ माहिती असलेले पुस्तक लिहिले असून या पुस्तकामध्ये अनेक छायाचित्रा सहित दाखले दिले आहेत. या पुस्तकाला प्रस्तावना लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी दिली आहे. पुस्तकाच्या शुभ संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे शुभसंदेश आहेत. याच बरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील १९ खासदारांनी आपल्या अनुभवाचा दाखला देत बारणे यांच्या कार्याचा गौरव या पुस्तकात केला आहे.

याप्रसंगी लोकसभा अध्यक्षा म्हणाल्या बारणे यांचे लोकसभेतील कामकाज गौरवण्यासारखे आहे. त्यांच्या ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकामध्ये संसदीय कामकाजा बरोबरच इतरांनी देखील कामकाजाची प्रेरणा घ्यावी अशा सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे एका खासदाराने करावी लागते याची मांडणी केली असून सर्व सामान्य जनतेमध्ये सध्या लोकसभेच्या कामकाजाविषयी होत असलेला गदारोळ पाहता नाराजी पसरते. या पुस्तकाच्या माध्यमातून इतर सदस्यांनीही बारणे यांचा चांगल्या कामाचा दाखला घ्यावा. बारणे हे सातत्याने विविध प्रश्नांच्याद्वारे संसदीय कामकाजामध्ये भाग घेतात कार्यकुशल खासदारामध्ये त्यांची गणना केली जाते. मी याअगोदरही त्यांच्या मतदार संघामध्ये चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकरांच्या टपाल तिकिटाचे   अनावरण प्रसंगी गेले असता त्यांचे कामही जवळून पाहिले आहे. केंद्र सरकारच्या पासपोर्ट कार्यालय निर्मिती पासून दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागात लाईट पोहचवण्यापर्यंत त्यांनी केलेले काम, हिंदुस्थान अँन्टीबायोटिक्स या ऐतिहासिक कारखान्याच्या अडचणीच्या काळात त्यांनी केलेली मदतीची धडपडही जनतेसाठी झोकून देणाऱ्या लोकप्रतिनिधीचे काम बारणे प्रत्यक्ष कृतीतून करत आहेत. त्यामुळे त्यांच्या ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण स्वीकारले असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन म्हणाल्या.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले बारणेंची काम करण्याची लोकसभेतील धडपडही चळवळीतील तळमळीचा कार्यकर्ता अशी असून आजच्या प्रसंगी असलेली लोकसभा सदस्याची उपस्थिती ही बारणे यांनी संसदेत त्याच्या स्वभावानी जमा केलेला ठेवा आहे. बारणे यांचे काम मी लोकसभेबरोबर ही त्यांच्या मतदार संघात पहिले असून लोकसभेचा कामकाजामध्ये जेवढा त्यांचा सहभाग असतो. तेवढाच जनसंपर्क ही त्यांचा मतदार संघामध्ये तेवढाच आहे. माझ्या एका सहकाऱ्याने संसदीय कामाकाजाच्या अनुभव असलेले पुस्तक लिहिले याचा सार्थ अभिमान असल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते म्हाणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, बारणे यांनी याअगोदर ही ३ पुस्तके लिहिली असून महाराष्ट्रातील एक मराठी खासदार दिल्ली मधील त्यांच्या अनुभवलेल्या कामकाजा विषयी पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करतो ही कदाचित पहिली घटना असावी. बारणे यांचा नम्र स्वभाव, प्रचंड लोकसंपर्क, थोड्या कालावधीत संसदेमध्ये मिळवलेला अनुभव या माध्यामातून दिल्ली येथे बारणे यांनी कार्यकुशल खासदार म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. बारणे यांच्या पुस्तकातून लोकसभेचा कामकाजाचा उलगडा होत असून त्यांचे पुस्तक इतरांनी वाचावे अशा प्रकारचे पुस्तक लिहिले असल्याचे असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज आहिर यांनीही बारणे यांच्या मी अनुभवलेली संसद या पुस्तकास शुभेच्छा दिल्या.

याकार्यक्रम प्रसंगी दिल्ली बरोबरच मावळ लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button