breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्र सरकारचे अनलॉक 4 साठी दिशानिर्देश जारी; देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी

केंद्र सरकार 1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अनलॉक – 4 मध्ये काय सुरु होणार याकडे सर्वांचे सक्ष लागले होते. अखेर केंद्र सरकारने अनलॉक 4 साठी दिशानिर्देश जारी केले आहेत. हे दिशानिर्देश ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहेत. या नव्या नियमावलीनुसार देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहेत.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक – 4 च्या नियमावलीत महानगरांमधील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नगरविकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मेट्रो सेवा टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. करोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील मेट्रो सेवा २२ पासून बंद होती.

कंटेन्मेंट झोन वगळता राज्य आणि केंद्र शासित प्रदेश स्थानिक पातळीवर कुठेही लॉकडाउन घोषित करू शकत नाही. राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना लॉकडाऊन घोषित करायचा असल्यास आधी त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करावी, असं केंद्राने दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

करोना संदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे झाले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. दुकानांमध्ये ग्राहकांदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे. मास्त घातलेले पाहिजेत. करोना संबंधी दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही? याची याचे निरीक्षण केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे, असं सरकारने स्पष्ट केलंय.

सामाजिक, शैक्षणिक, स्पोर्ट्स, मनोरंज, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि इतर कार्यक्रमांना २१ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. पण त्यासाठी अट आहे. १०० हून अधिक व्यक्ती या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नयेत, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button