breaking-newsराष्ट्रिय

लग्नानंतर नववधूचा पहिल्याच दिवशी ड्रग्जसाठी थयथयाट; बांगड्या फेकल्या

पंजाब – नशेच्या विळख्यात पंजाब राज्य सापडल्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. याचे भीतिदायक उदाहरण फिरोजपूरमध्ये पाहण्यास मिळाले. तिच्या आई-वडिलांनी मुलीचे लग्न थाटामाटात करून दिले. मुलानेही भावी आयुष्याची अनेक स्वप्ने रंगवली असतील. परंतु त्याच्या स्वप्नांना पहिल्याच दिवशी तडा गेला. सासरी आलेल्या नववधूने ड्रग्जसाठी घरात गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. हातातील बांगड्या फेकून दिल्या आणि घरात जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. तिचा अवतार पाहून सासू-सासरे घाबरून गेले. त्यांनी तिला नशामुक्ती केंद्रात नेले. तेथे उपचार केल्यानंतर रुग्ण नशा करते, असे लिहून देण्याची विनंती केली. त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे. (मुलगी व संबंधिताची नावे दिली नाहीत)

काही दिवसांपूर्वी नशामुक्ती केंद्रात एक दांपत्य नवविवाहितेचे व्यसन सोडवण्यासाठी नशामुक्ती केंद्रात आले. परंतु नववधू नशा न मिळाल्याने तडफडत होती. केंद्रावर आल्यानंतर डॉक्टरांनी तरुणीवर उपचार सुरू केले. त्यानंतर ती शांत झाली. सासू व सासऱ्यांनी सांगितले, आमच्या मुलासोबत गेल्या गुरुवारीच या मुलीशी लग्न लागले. मुलीला नशेचे व्यसन आहे याची कल्पना नव्हती. लग्न व्यवस्थित पार पडले.त्यानंतर आमच्या घरी आल्यावर नशेची मागणी करू लागली. ती जोरात ओरडत होती. तिने बांगड्या काढून फेकल्या. ड्रग्जसाठी पाया पडत होती, विनवण्या करत होती. ते पाहून माझ्या मुलास धक्का बसला. तो तिला तिच्या वडिलांकडे ताबडतोब पाठवून द्या, असे म्हणत होता. आम्ही कशीबशी त्याची समजूत काढली व मुलीस नशामुक्ती केंद्रात आणले, असे सासरे म्हणाले.

डॉक्टरांनी सांगितले, या तरुणीस गेल्या दोन वर्षांपासून हेरॉइनचे व्यसन आहे. यामुळेच तिने लग्नानंतर सासरी आल्यावर नशा मागण्यास सुरुवात केली. नंतर तर तिने गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. सासू व सासरे तिला नशामुक्ती केंद्रात घेऊन आले. त्यांनी डॉक्टरांना सांगितले, ही तरुणी व्यसनी आहे. नशा करते असे लिहून देण्याचा आग्रह त्यांनी धरला. ही बाब आम्ही तिच्या आईवडिलांना सांगून तिचे व्यसन सोडवण्याचे प्रयत्न करतो.

मात्र, डॉक्टरांनी म्हटले, नशेचे व्यसन हा आजार आहे. यावर उपचार शक्य आहे. नशा खूप वाईट असते हे समजावून सांगा. यानंतर सासरचे लोक कसेबसे तिच्यावर उपचार करण्यास तयार झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button