Views:
220
मुंबई – जगभरात 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भायखळा येथील राणी बागेतील बंगल्यावरही रोषणाई करण्यात आली आहे.
वाचा :-मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला जांभळ्या रंगाची रोषणाई केली आहे. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्याला गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर रोषणाईने उजळून निघाला आहे. जगातील सर्व महिलांना सन्मान देण्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गुलाबी रंगाने रोषणाई केली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Like this:
Like Loading...