breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘भुज’ला आयपीएलचा फटका

मुंबई – हिंदी सिनेमावाल्यांना ओटीटीचं व्यासपीठ आपलं वाटू लगालं आहे. सिनेमे थिएटरवर रिलीज झाले नाहीत तरी ते ओटीटीवर रिलीज करून फायदा करून घेण्याकडे कल आहे. पूर्वी आयपीएल, वर्ल्डकप आले की सिनेमागृहाच्या तिकीट खिडकीवर परिणाम व्हायचा. तसा परिणाम ओटीटीवर होणार आहे.

ओटीटी व्यासपीठावर अनेक सिनेमे आले. आता येत्या काळातही येणार आहेतच. पण आयपीएलचा मौसम लक्षात घेऊन ओटीटीवर येणाऱ्या भुज, लक्ष्मी बॉम्ब यांसाख्या सिनेमांना फटका बसणार आहे. कारण आयपीएल ज्या ओटीटीने घेतलाय त्याच ओटीटीवर हे सिनेमे येणार आहेत. डिस्ने हॉटस्टारवर आयपीएल दाखवली जाणार आहे. आता हा हंगाम सुरू होणार आहे 19 तारखेपासून. 19 सप्टेंबरला हा महौल जमून येईल तो 10 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. आयपीएलची भारतात आणि एकूणच जगभरात असलेली क्रेझ लक्षात घेऊन त्याच ओटीटीवर रिलीद होणारे सिनेमे काही काळासाठी थांबवले जातील.

यापूर्वी अक्षयकुमारची मुख्य भूमिका असणारा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. पण तो ऐनवेळी पुढे ढकलला गेला. आता त्याची तारीख दिवाळीतली असणार असल्याचं बोललं जात आहे. हा सिनेमा डिस्ने हॉटस्टारकडे आहे. शिवाय भुज हा अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपटही याच डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार होता. तो आता कदाचित नोव्हेंबरच्या 10 तारखेनंतर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याच ओटीटीवर आयपीएल असल्यामुळे यावर रिलीज होणारे सिनेमे पुढं ढकलण्याबाबत चर्चा झाली आहे.

नेटफ्लिक्स, हॉटस्टार या दोन्ही ओटीटी दुनियेतल्या मोठ्या स्पर्धक कंपन्या मानल्या जातात. दोघांमध्ये सिनेमांना घेऊन मोठी स्पर्धा असते. आता आयपीएल हॉटस्टारवर आल्यानंतर नेटफ्लिक्स काही नव्या गोष्टी चाचपून पाहात असल्याचं कळतं. त्या काय आहे हे येत्या काळात कळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button