breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लक्ष्मीपूजनानिमित्त सर्व खाद्यतेले एकाच दरात; व्यापारी महासंघाचा निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त विविध कंपन्यांची सर्व खाद्यतेले एकाच दरात विक्री करण्याचा निर्णय खाद्यतेल व्यापारी महासंघाने घेतला आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिली आहे.

ठक्कर म्हणाले, राज्यातील सर्व प्रमुख खाद्यतेल विपेते असोसिएशचे सदस्य आहेत. त्यांच्याद्वारे तेल वितरक व तेलाच्या घाऊक व्यापाऱयांशी दररोज व्यवहार केले जातात. यावेळी प्रत्येकाचे तेलाचे दर वेगवेगळे असतात. पण यंदा दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाला सर्व उत्पादकांनी व्यापाऱयांना एकसमान दराने तेल विक्री करावी, असे महासंघाकडून आव्हान करण्यात आले आहे.

त्याप्रमाणे विविध कंपन्या या तेलांची एकाच दरात विक्री करणार आहेत. त्यामध्ये रुची सोया, गोकुळ रिफाईण्ड ऑईल, फ्रिगोरिफिको अल्लाना, लिबर्टी ऑईल मिल्स, वेस्ट इंडिया कॉन्टीनेन्टल ऑईल्स, कॅरगिल इंडिया, अदानी विल्मर, प्रकाश ऍग्रो, आणि गोल्डन ऍग्री रिसोर्सेस कंपन्यांचा सहभाग आहे.

दुपारी दोन वाजल्यापासून असोसिएशचे सदस्य असलेले तेल उत्पादक विविध ब्रॅण्डच्या तेलाची एकसारख्या दराने घाऊक विपेत्यांना ऑनलाईन पोर्टलवर विक्री करतील. तर घाऊक विपेते किरकोळ दुकानदारांनाही त्यानुसार एकसारख्या दरानेच तेलविक्री करतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button