breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील मालाडमध्ये दुमजली घर कोसळलं

मुंबई | मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळलं. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली दबून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 6 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 1 रेस्क्यू व्हॅन आणि 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत 6 नागरिकांना बाहेर काढलं आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे मालाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button