breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार बच्चू कडूंचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर

मुंबई – विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत. मात्र, शनिवारी चार अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेची विधानसभेतील आमदारांची संख्या ६० वर पोहचली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

ANI✔@ANI

Shiv Sena gets support of 2 more MLAs of Prahar Janshakti Party. Bachchu Kadu of Achalpur assembly constituency and Rajkumar Patel of Melghat assembly constituency met Shiv Sena Chief Uddhav Thackeray last night and extended their support to him. #Maharashtra

View image on Twitter

बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.

विधानसभा निवडणुक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर आता प्रहर जनशक्तीच्याही या दोन आमदारांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय. त्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्या आता 60 झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button