breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात बलिप्रतिपदेला बळीराजाची मिरवणूक निघणार- सत्यशोधक प्रबोधन महासभा

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि बळीराजा गौरव समितीच्या वतीने दरवषीप्रमाणे यंदाही बलिप्रतिपदेला बळीराजाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

महात्मा फुले वाडा (समता भूमी) ते लाल महाल अशी बळीराजा ची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. हमाल पंचायतचे डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते फुले वाडय़ातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळय़ास आणि बळीराजाला पुष्पहार अर्पण करून फळे, भाजीपाला, धनधान्याने, सजविलेल्या बैल गाडीतून धनधान्य, फळे, भाजीपाला जनतेला वाटत फुले वाडा ते वस्ताद लहुजी साळवे तालीम कडून लाल महाल येथे ही मिरवणूक पोहचणार आहे.

समारोपावेळी प्रबोधन पर भाषणे आणि पानसुपारी चा कार्यक्रम होईल. सर्वांनी जास्तीत जास्त संख्यने या विश्वसम्राट बळीराजा मिरवणुकीत सामील व्हावे. आपल्या परिसरात बलिप्रतिपदा दिनी बळीराजाची सर्वत्र भव्य मिरवणूक काढावी, असे आवाहन प्रतिमा परदेशी यांनी जनतेला केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button