breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोहित पवारांची जामखेडमध्ये भव्य मिरवणूक, 30 जेसीबीतून गुलाल उधळणार

अहमदनगर : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेड शहर सज्ज झालं आहे. रोहित पवारांच्या विजयी मिरवणुकीत एक-दोन नव्हे, तर तब्बल 30 जेसीबीच्या फाळक्यातून गुलाल उधळला (Rohit Pawar JCB Celebration) जाणार आहे.

अहमदनगरमधील जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक चौकात एक जेसीबी उभा करण्यात आला आहे. 30 जेसीबींमधून गुलाल उधळून करणार रोहित पवार यांचं स्वागत करण्यात येणार आहे.

निवडून आल्यानंतर रोहित पवार पहिल्यांदाच जामखेड शहरात दाखल होत आहेत. जनतेचे आभार मानण्यासाठी रोहित पवार आपल्या मतदारसंघात येणार आहेत. आभार मानल्यानंतर रोहित पवार यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button