breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: चिंताजनक! पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, एकाचदिवशी 550 रुग्ण

पुणे: पुणे जिल्ह्यात काल (17 जून) दिवसभरात 550 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैकी 444 रुग्ण हे पुणे शहरात आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 235 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करत आहेत. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 15 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 553 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 117 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढवण्यात आणि मृत्यूदर कमी करण्यात पालिका प्रशासनाला यश आलं आहे. त्यामुळे पुणे खुलं केल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा काहीदिवसांपूर्वी आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला होता. त्यासोबत जून अखेर अॅक्टिव्ह रुग्ण 6 हजारांवर जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितलं होते.

पुण्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 9.6 टक्क्यांवरुन 4.66 टक्क्यांवर घसरला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 19 दिवसांवर गेला आहे. दरम्यान, राज्यातही रुग्णांची वाढ सातत्याने होत आहे. राज्यात काल 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 166 रुग्ण बरे झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button