breaking-newsक्रिडा

रोहितने भारताचा वनवास संपवला, सेहवागनंतर अनोखी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय निवड समितीने लोकेश राहुलला संघातून डच्चू देत रोहित शर्माला संधी दिली. रोहितनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं पुरेपूर सोनं करत, कसोटी मालिकेतलं तिसरं शतक झळकावलं. विशाखापट्टणम कसोटीत रोहितने पहिल्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावलं होतं. रांची कसोटीत अजिंक्य रहाणेसोबत रोहितने द्विशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. या खेळीदरम्यान रोहित शर्माने भारताचा वनवास अखेरीस संपवला आहे.

कसोटी मालिकेत सलामीवीर रोहितने ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. २००५ साली पाकिस्तानविरुद्ध मालिकेत सेहवागने सलामीला येत ५०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. यानंतर तब्बल कोणत्याही भारतीय सलामीवीराला ही कामगिरी करता आलेली नव्हती. अखेरीस तब्बल १४ वर्षांनी रोहित शर्माने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

Bharath Seervi@SeerviBharath

500+ runs for Rohit Sharma in this series.

The last Indian opener to score over 500 runs in a series was Sehwag against Pakistan in 2005.

Vinoo Mankad, Budhi Kunderan and Gavaskar (5 times) are the other Indian openers to do so. #IndvSA५४५११:१९ म.पू. – २० ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता१०७ लोक याविषयी बोलत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button