breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नाताळनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा संदेश

देशभरात ख्रिसमस उत्सहात साजरा : दया,क्षमा,शांती,परोपकाराचा संदेश

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दया,क्षमा,शांती,परोपकाराचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्तांचे जीवन मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित होते. मानवसेवेचा आदर्श,प्रेरणास्रोत असलेल्या येशूंच्या जन्मदिनी साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख,शांती,समृद्धी,उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शब्दात पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

ख्रिसमस डे दरवर्षी २५ डिसेंबर रोजी जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कारण येशू ख्रिस्ताचा जन्म याच शुभ तिथीला झाला होता. ख्रिसमस हा ख्रिश्चनांचा मुख्य सण आहे. आजकाल हिंदूंमध्ये नाताळ सणाबद्दल खूप उत्साह आहे. भारतातही ख्रिसमसचे महत्त्व वाढत आहे. येशू ख्रिस्त उच्च आणि नीच भेदावर विश्वास ठेवत नव्हता. प्रेमाने आणि बंधुभावाने जगण्याचा संदेश त्यांनी जगातील जनतेला दिला. ख्रिसमस देखील खूप महत्वाचा आहे कारण काही दिवसांनी नवीन वर्ष देखील येते. डिसेंबर महिन्यातील शेवटचे 10 दिवस उत्साहाने भरलेले आहेत.

दरम्यान, प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळनिमित्त राज्यातील जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्तांनी जगाला शांती, प्रेमाचा संदेश दिला. यातून प्रेरणा घेऊन आपण एकमेकांचा आदर करूया, परस्परांची काळजी घेऊया. ख्रिस्त जन्मोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौहार्दाचे क्षण घेऊन येवो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button