breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये 491 मतदान केंद्र, तर 12 केंद्र संवेदनशिल

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाच लाख 18 हजार 309 मतदार असून 491 केंद्रावर मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. तर थेरगाव, नवी सांगवी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, वाकड येथील 12 मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात दोन लाख 76 हजार 927 पुरुष आणि दोन लाख 41 हजार 980 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 18 हजार 309 मतदार आहेत. त्यामध्ये 495 दिव्यांग मतदारांचा समावेश असून 171 सैनिक मतदारांनाही मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. 491 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 33 मतदान केंद्राचे स्थलांतरण करण्यात आले आहे. मतदानाकरिता 491 कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट तयार करण्यात आली आहेत. 98 कंट्रोल युनीट, बॅलेट युनिट आणि 50 व्हीव्हीपॅट राखीव म्हणून तयार करण्यात आली आहेत.

पिंपळेनिलख येथील मतदान केंद्र क्रमांक 358 या सखी मतदान केंद्रावर निवडणूक कामकाजाकरिता सर्व महिला कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. महात्मा फुले इंग्लिश मिडीयम स्कूल केंद्र क्रमांक 37 आणि जी.के. गुरुकुल केंद्र क्रमांक 278, विझडम वर्ल्ड स्कूल केंद्र क्रमांक 338 या मतदान केंद्राची आदर्श मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.

थेरगाव, नवी सांगवी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, वाकड येथील 12 मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. संवेदनशील मतदार केंद्रासह 53 मतदान केंद्रामध्ये वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये पोलीस यंत्रणेमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button