breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता, पण..’; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

२०१९ ला उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात काल महाराष्ट्र आणि गोव्यातील एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप-शिवसेना युतीवर भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी असलेले नेते. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात शरद पवार यांची छाप दिसून येते. शरद पवार यांचे डावपेच भल्याभल्यांना संभ्रमात टाकतात. लोकसभा निवडणूक झाली. निकाल लागले आणि पंतप्रधानपदाचा विषय आला की अनेकदा शरद पवार नाव यांचे सर्वांत पुढे असते. पण राजकीय मुत्सद्देगिरी सर्वश्रुत असतानाही पंतप्रधानपदाने अनेकदा त्यांना हुलकावणी दिली. यावर आता थेट पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसने त्यांना डावलले.

हेही वाचा – ‘नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले, त्यामुळे..’; अरविंद सावंत यांची खोचक टीका 

२०१९ ला उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. भाजपने ही युती तोडली नाही. यापुढेही एनडीए म्हणून कायम राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

NDA ची युती गेल्या २५ वर्षांपासून मजबूत आहे, हे नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत सांगितलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नेते एकेकेळी एनडीएसोबत होते. पण आता ते एनडीएपासून दूर गेले. त्यांना आम्ही दूर केले नाही. ते स्वत:हून एनडीए बाहेर गेले, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button