breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन आता राज्य सरकार खरेदी करणार

मुंबई | राज्य सरकार कोरोनाच्या या संघर्षात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या लढ्यात राज्य सरकारने आता एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन आता राज्य सरकार खरेदी करणार आहे.

प्रयोगशाळा, प्राणी आणि वैद्यकीय अभ्यास यांच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये आशादायक परिणाम मिळाला आहे. रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचे सांगितले होते. WHO सुचविते की Covid19 उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचे हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. आणि याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसेल अशी आशा बाळगायला हवी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button