breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाविरुद्धच्या लढाईत अतिश बारणे यांचे योगदान

परिसरात मदत कार्य : औषध फवारणी, सॅनिटाईझर वाटपासह विविध उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

कोविड-19 विषाणुच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी विविध उपक्रम हाती घेतले.

सामाजिक बांधिलकी जपत परिसरात औषध फवारणी, धान्य वाटप, सॅनिटाईझर वाटप, आरोग्य शिबीर, मास्क वाटप करण्यात आले.

तसेच, मोशी, चिखली, कुदळवाडी परिसरातील कष्टकरी, मजुरांसह सर्वसामान्य नागरिकांना अतिश बारणे गेल्या दोन महिन्यांपासून मदत करीत आहेत.

दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सूचनेनुसार, संजय गांधीनगर येथील काही कुटुंबियांना मदत करण्यासाठी अतिश बारणे यांनी पुढाकार घेतला होता.

यावेळी अतिश बारणे म्हणाले की, शहरातील कोरोनाग्रस्तांचा 700चा आकडा आज (दि.6) पार झाला आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. परिणामी, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता लॉकडाउन नाही. जनजीवन सुरु झाले आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढणार आहे. झोपडपट्टी, गावठाण भागात रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात रुग्ण संख्येत वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button