breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ७०८; शहरवासीयांची चिंता वाढली

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांचा 700चा आकडा आज (दि.6) पार झाला आहे. आज आत्तापर्यंत 29 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 708 झाली आहे. दि. 10 मार्च ते 6 जून या 89 दिवसात औद्योगिकनगरीने सातशेचा आकडा पार केला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे 416 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजमितीला 280 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

दि. 10 मार्च रोजी एकाचदिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. 22 मे पासून शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले. त्यानंतर रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दिवसाला 40 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. परिणामी, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

मार्च, एप्रिल या दोन महिन्यात शहरातील रुग्णसंख्या 200 वर होती. पण, मागील काही दिवसात शहरात तब्बल 500 नवीन रुग्ण वाढले आहेत. यामुळे औद्योगिनगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 89 दिवसांत सातशेचा आकडा पार केला आहे. आता लॉकडाउन नाही. जनजीवन सुरु झाले आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढणार आहे. झोपडपट्टी, गावठाण भागात रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात रुग्ण संख्येत वाढ होण्याचा अंदाज आहे. जूनअखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या अडीच ते तीन हजार होईल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवश्यकता आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ!

कोरोना पॉझिटिव्ह आहे. पण लक्षणे काहीच नाहीत. अशा रुग्णांचे पिंपरी-चिंचवड शहरात प्रमाण जास्त होते. केवळ चार ते पाच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. परंतु, आता लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरातील 280 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 105 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 16 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, 127 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. पण, त्यांच्यात कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. दरम्यान, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आजपर्यंत 416 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. 12 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button