breaking-newsटेक -तंत्र

रेडमीचे नवीन वायर्ड इयरफोन्स २ सप्टेंबर रोजी होणार लाँच

नवी दिल्ली – स्मार्टफोन कंपन्या मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या ट्रेंडला फॉलो करताना रेडमीने आपले नवीन वायर्ड इयरफोन्सची झलक दाखवली आहे. हे वायर्ड इयरफोन्स २ सप्टेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने नवीन वायर्ड इयरफोन्सचा एक टीझर व्हिडिओ शेयर केला आहे.

ट्विटरवर शेयर केला टीझर व्हिडिओ
रेडमी इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेयर करण्यात आलेल्या २३ सेकंदाच्या व्हिडिओत इयरफोन्सची आऊटलाइनसोबत ९० डिग्रीच्या अँगलवर सेट केलेल्या 3.5mm कनेक्टर ला पाहू शकता. या व्हिडिओत पोस्टमध्ये कंपनीने #WiredForEverything चा वापर केला आहे.

पॅसिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचर
नवीन इयरबड्समध्ये पॅसिव्ह कॅन्सलेशनसाठी सिलिकॉन टिप्स देण्यात आली आहे. हे रियलमी बड्स क्लासिक पेक्षा वेगळे आहे. जे अॅपल इयरपॉड्सप्रमाणे ओपन फीट डिझाईन सोबत येते. व्हिडिओ इयरफोन्सच्या कलरवरून माहिती होत आहे की, हे कलर रेड आणि ब्लू आहे.

10mm चा ड्राइवर मिळू शकतो
प्रसिद्ध लीक्सटर इशान अग्रवालने या इयरबड्ससंबंधी आणखी डिटेल शेयर केले आहेत. इशानच्या माहितीनुसार कंपनी याला रेडमी इयरफोन्सच्या नावाने विक्री करणार आहे. तसेच इयरफोन्सच्या दमदाल ऑडियोसाठी 10mm ड्राइवर्सचा वापर करण्यात आला आहे. हे इयरफोन्स मॅटेलिक बॉडी आणि लाइट वेट मध्ये येतील. किंमत कंपनी रियरलमी बड्स क्लासिकच्या किंमती इतकी ठेवण्याची शक्यता आहे. 14.2mm च्या रियलमी बड्स क्लासिकची किंमत ३९९ रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button