breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रुंदीपेक्षा छातीवरील शौर्यपदके महत्त्वाची

  • इसाक बागवान यांच्या पुस्तक प्रकाशनात उद्धव ठाकरे यांचा टोला

अलीकडे देशात ५६ इंची छातीची चर्चा आहे. छाती किती रुंद आहे यापेक्षा त्या छातीवर शौयपदके किती आहेत हे मोजमाप जास्त महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त इसाक बागवान यांच्या ‘मी अगेन्स्ट दी मुंबई अंडरवर्ल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांनी केले. पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

आपली, आपल्या कुटुंबाची काळजी, सुरक्षा मुंबई पोलीस घेतात. पण पोलिसांच्या कुटुंबांची काळजी कोण घेते. खरे तर पोलीस जनतेचे पालक आहेत. त्यामुळे सरकार गेले खड्डय़ात, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. जीव जोखमीत घालून जे कर्तव्य बजावतात ते खरे हिरे. त्यांचे बलिदान, योगदानावर चित्रपट यायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे यांच्याआधी बोलताना खासदार राऊत म्हणाले, बागवान बारामतीचे. बारामतीतल्या दोनच व्यक्ती प्रसिद्ध आहेत, पवार  आणि बागवान. पण पवारांच्या आधी बागवान यांनी बारामतीची ओळख दिल्लीला करून दिली. सत्र न्यायालयात डेव्हिड परदेशी या गुंडाला गोळ्या घालून बागवान आणि त्यांचे बारामती दिल्लीत प्रसिद्ध झाले. ५६ इंची छातीची प्रचीती बागवान यांच्याकडे पाहून मिळते. छगन भुजबळ विरोधी पक्षनेते झाले. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्या बंगल्यावर हल्ला चढवला. त्यावेळी बागवान आणि त्यांचे सहकारी कर्तव्यावर होते. ते जर नसते तर इतिहास वेगळा असता. त्यांच्यामुळे आमचे मिशन फेल झाले, ही खंत आजही आहे, अशी कोपरखळी राऊत यांनी मारली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button