breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

ठाकरे गटाची याचिका दाखल करुन घेण्यास न्यायालयाचा नकार

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी

दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. याचिका दाखल करण्यासाठी उद्या या असे न्यायालयाकडून ठाकरे गटाला सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

न्यायालयाने यासंदर्भात ठाकरे गटाला उद्या पुन्हा याचिकेसंदर्भात मेन्शनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर याचिका दाखल करून घ्यायची की नाही? याबाबत न्यायालय निर्णय घेईल, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाकडून याचिका दाखल होण्यापुर्वी शिंदे गटाने कॅव्हेट दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता ठाकरे गटाची याचिका दाखल करून घेतानाही शिंदे गटाची बाजून न्यायालयाकडून ऐकून घेतली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button