breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रिहानाच्या ट्विटवर कंगना म्हणते, ‘गप्प बस मूर्ख! ते शेतकरी नाही, दहशतवादी आहेत’

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील ६९ दिवसांपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या बॉर्डर्सवर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत जागतिक स्तरावरूनही चिंता व्यक्त केली जात आहे. जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हिनेदेखील शेतकरी आंदोलनावर कोणीही भाष्य करत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तिने सीएनएन या वृत्तसंस्थेची एक बातमी ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याबाबत चर्चा का नाही करत’, असा सवाल उपस्थित केला आहे. तिचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून त्यावर जगभरातील लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने अतिशय तिखट शब्दात रिहानाच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.

वाचा :-शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाचा सवाल

तिने म्हटलंय की, ‘या आंदोलनाबाबत कोणी बोलत नाहीये कारण ते शेतकरी नाही, तर दहशतवादी आहेत जे भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून चीन मोडकळलेल्या भारताचा ताबा घेऊ शकेल आणि अमेरिकेप्रमाणे भारतात चिनी वसाहत स्थापन करू शकेल. गप्प बस मूर्ख. तुमच्यासारख्या बनावट लोकांसारखा आम्ही आमचा देश विकायला काढला नाहीये’, असे तिखट प्रत्युत्तर कंगनाने दिले आहे. कंगनाच्या या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, केवळ रिहानानेच नाही तर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेसुद्धा शेतकरी आंदोलनावर ट्वीट करत शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. ‘आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या सोबत आहोत’, असे ट्विट तिने मंगळवारी रात्री केले.

https://twitter.com/KanganaTeam/status/1356640083546406913

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button