breaking-newsआंतरराष्टीय

तालिबानचा ‘गॉडफादर’ मौलाना समी- उल- हकची हत्या

तालिबानचा गॉडफादर अशी ओळख असलेला मौलाना समी उल हकची हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे. पाकिस्तानी मीडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे. रावळपिंडीमध्ये शुक्रवारी त्याची हत्या करण्यात आली. पाकिस्तानमधला एक धार्मिक आणि कट्टर नेता अशी त्याची ओळख होती. जमात उलेमा ए-इस्लाम-समी चा तो प्रमुखही होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हत्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान एका धार्मिक नेत्याला मुकला आहे. त्यांचे पाकिस्तानच्या सेवेतले योगदान कायम स्मरणात राहिल असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

ANI Digital

@ani_digital

Former Pakistan senator Maulana Samiul Haq, also known as the ‘Father of Taliban’ stabbed to death at his residence in Rawalpindi

Read @ANI Story | https://www.aninews.in/news/world/asia/pakistan-father-of-taliban-maulana-samiul-haq-killed201811022107410001/ 

जियो न्यूज या पाकिस्तानी चॅनलने दिलेल्या माहितीनुसार समी उल हक ची हत्या त्याच्या रावळपिंडी येथील घरातच करण्यात आली. त्याची हत्या झाल्याची माहिती खरी असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनीही म्हटले आहे. काही हल्लेखोरांनी चाकूचे वार करत समी-उल-हक यांना ठार केले असेही समजते आहे. इस्लामाबाद या ठिकाणी समी उल हक एका निदर्शनात सहभागी होण्यासाठी गेला होता. मात्र रस्ता बंद असल्याने तो घरी परतला तो त्याच्या घरात आराम करत होता तेव्हा तो मारला गेला अशी माहिती त्याच्या मुलानेही दिली आहे. हकचा ड्रायव्हर काही वेळासाठी बाहेर गेला होता त्याचवेळी त्याची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह त्याच्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आम्ही पाहिला असेही हकच्या मुलाने सांगितले आहे.

समी उल हकची हत्या झाली तेव्हा त्याच्या घरी कोणीही नव्हते. ही हत्या कोणी केली असावी ते अद्याप तरी सांगता येत नाही असे त्याच्या पक्षाच्या एका नेत्याने म्हटले आहे. समी उल हक जेव्हा कारने निदर्शनासाठी जात होता तेव्हा काही लोकांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला होता अशीही माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button