breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा अभाव ; भारिप बहूजन महासंघाचे आंदोलन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्याचा खुद्द अनुभव महापाैरांच्या प्रभागातील रुग्णांना आला. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा कधी मिळणार आहे, असा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाकडून पिंपरी-चिंचवड वैद्यकीय विभागाचा निषेध व्यक्त करुन आंदोलन केले. 

या आंदोलनासाठी अध्यक्ष देवेंद्र तायडे, महिलाध्यक्षा लता रोकडे, गुलाब देवराम पानपाटील, युवक अध्यक्ष राजेंद्र मगर, रजनीकांत क्षीरसागर, राहुल शितोळे, अंकुश कानडी, कैलास वाघमारे, भगवान पारे, आकाश डोंगरे, विष्णू सरपते, रमेश गायकवाड, राहुल शिंदे, रघुनाथ आव्हाड, दशरथ शिंदे, बहुजन प्रतिष्ठान अध्यक्ष विजय साळवे, सुधाकर सूर्यवंशी, मिलिंद कांबळे, विनायक निंबाळकर, मधुकर शेलार, भागवत सोनकांबळे आदी उपस्थित होते.

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने डॉ. पवन साळवी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. रुग्णालयात वेळेवर औषध पुरवठा वेळेवर होत नाही. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नाही. रुग्णालयातील सुविधांचा दर्जा ढासळला आहे. रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धट वर्तन करतात. अशा कर्मचारी आणि अधिका-यांवर कारवाई करावी. बहुतांश वेळेला प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना आयसीयूमध्ये जागा नसल्याने सामान्य वॉर्डमध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे आयसीयू वॉर्डची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. तातडीच्या रुग्णांचे केसपेपर तात्काळ मिळण्याची व्यवस्था करावी. रुग्णांना ड्रेसकोड करावा. यासाठी जबाबदार अधिका-यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button