breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

… तर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करु – आयुक्त श्रावण हर्डिकर

पालिकेतील अधिकारी-कर्मचा-यांच्या पाठिशी उभं राहू, कर्मचा-यांनी काळ्या पट्ट्याबांधून निषेध

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी-कर्मचा-यांना कर्तव्य बजाविताना लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून वारंवार मारहाणी प्रकार, तोंडाला काळे फासणे, कोंडून ठेवणे, यासह अन्य प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे कर्मचारी-अधिका-यांना काम करताना भितीदायक वातावरण निर्माण होवू लागले आहे. याबाबत कर्मचारी-अधिकारी कर्तव्य बजाविताना कोणी कामकाजात अडथळा आणून मारहाण किंवा तोंडाला काळे फासण्याचा प्रकार केल्यास खपवून घेणार नाही. तर संबंधिताविरोधात तत्काळ सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करु, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच यापुढे मी अधिकारी-कर्मचा-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कासारवाडी येथील ग्रामस्थांना पाणी मिळत नाही, चार-पाच दिवसातून पाणी येते, याबाबत पाणी पुरवठा अधिका-यांना वारंवार तक्रार करुनही दखल घेत नाहीत. यावरुन संबंधित अधिकारी तक्रारी ऐकण्यास आल्यानंतर त्या सर्व अधिका-यांना कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला. तसेच यापुर्वी कर्मचा-यांना मारहाणीचे प्रकार देखील घडलेले आहेत. याबाबत महापालिकेच्या अभियांत्रिकी व पाणी पुरवठा अधिकारी-कर्मचा-यांनी आयुक्तांना पत्र देवून न्याय देण्याची भूमिका मांडली होती. यासह संबंधितावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली. तसेच पाणी पुरवठा कर्मचा-यांनी आम्हाला मारहाण झाल्यास कामकाज न करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. महापालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ काळ्या पट्याबांधून निषेध व्यक्त करण्यात आला.

आयुक्त हर्डिकर म्हणाले की, अधिकारी-कर्मचा-यांना यापुढे मारहाणीसह अन्य प्रकार घडल्यास पोलिसाची गरज पडल्यास मागवून घेवू, त्याच्याकडे सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्यात येईल. मात्र, संबंधिताना तत्काळ पोलिसाकडे वैयक्तिक पातळी तक्रार दाखल करण्याच्या सुचना केल्या आहेत. आयुक्त म्हणून माझं त्याना पुर्णपणे पाठबळ राहणार आहे. त्यावेळी कोणत्याही पक्षाचा विचार न करता कार्यवाही करण्यात येईल. संबंधित कर्मचा-याने तक्रार देण्याची भूमिका घेतल्यास त्याला आमचं पाठिशी आम्ही कायम राहणार आहे. मात्र, त्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचीही दखल घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button