breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘राहुल गांधींनी देशाची माफी मागावी’; पिंपरीत भाजपचा ‘शंखनाद’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राफेल विमान खरेदी करार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप खोटे ठरले आहेत. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रतिमा डागाळण्याचा काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने उधळून लावला आहे. या खोटारडेपणाबद्दल राहुल गांधी यांनी देशातील सर्व जनतेची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (दि. १६) आंदोलन करण्यात आले.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गांधी यांनी देशातील जनतेची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य उमा खापरे, शहर सरचिटणीस व प्रवक्ते अमोल थोरात, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, शीतल शिंदे, बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, “गेल्या एप्रिल महिन्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी कराराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना टार्गेट केले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. ही क्लिन चिट देताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा आरोपांची राळ उडवली होती.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि राहुल गांधी यांचा माफीनामा म्हणजे नरेंद्र मोदी सरकारच्या पारदर्शक कारभारावरील शिक्कामोर्तब आहे. पंतप्रधान मोदी यांची स्वच्छ प्रतिमा डागाळण्याचा काँग्रेसी कट देशातील सर्वोच्च न्यायसंस्थेनेच उधळून लावला आहे. काँग्रेसने तसेच या पक्षाच्या निष्क्रिय माजी अध्यक्षाने देशातील जनतेची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button