ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

तोंडाला काळया पट्ट्या बांधून,राष्ट्रगीत गात अर्धनग्न नागरिक पाण्यात उभे, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करा

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थेचे लक्षवेधी आंदोलन

पिंपरी चिंचवडः आळंदी येथील पवित्र नदी इंद्रायणीमध्ये पिंपरी-चिंचवड भागातील व आळंदी परीसरातील वेगवेगळ्या आस्थापनातील रसायनयुक्त प्रक्रिया न केलेले इंद्राणीत पाणी सोडले जात असल्यामुळे इंद्रायणीचा जीव गुदमरतोय. शिवाय परवाच कार्तिकी एकादशी आहे व पुढच्या महिन्यात संजिवन समाधी सोहळा आहे ,लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, वारकरी आळंदीमध्ये भक्ती भावाने स्नान करून पवित्र जल प्राशन करतात, वारकऱ्यांबरोबर आळंदीकर यांचाही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण यंत्र मंडळ व पिंपरी-चिंचवड पालिकेला व आळंदी नगरपरिषदेला जाग आणण्यासाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळी पट्टया बांधून, घोषणांद्वारे, अर्ध नग्न होऊन आळंदी येथे इंद्रायणीच्या पाण्याच्या पात्रामध्ये उतरून मूक आंदोलन केल्याचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.

जोगदंड यांनी सांगितले कि रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यावर आस्थापना, व्यवसायिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली. भाविकांच्या भावनेशी खेळण्याचे पाप आस्थापना व शासकीय यंत्रणा करत आहेत ,भावनिक हेच पवित्र पाणी पितात जर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर अंदोलन करू शिवाय सर्व साहित्यिक एकत्र येऊन पाण्यात उतरून कविसंमेलन घेऊ असा सज्जड ईशारा दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी दिला. महराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेने व नगरपरिषदेने सयुक्तिक कठोर कार्यवाही करावी तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी .वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नये.

यावेळी आळंदी शहर सचिव रवी भेंकी म्हणाले की,मी आळंदीला राहतो.जातांना येताना इंद्रायणी नदी फेसाळलेली व काळवेंडलेली बघून मनाला खूप वेदना होतात ,काळजाचा ठोका चुकतो. प्रहार जनशक्ती चे जिल्हाध्यक्ष अँड अनंत काळे म्हणाले की आम्ही अनेक वेळा आंदोलने केली पण तात्पुरती मलमपट्टी होते नंतर जैसे थै असे होते यामुळे प्रशासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही .यावेळी मान्य हक्क संरक्षण जागृतीचे शहरातील अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की कार्तिकी यात्रेपर्यत ठोस उपाययोजना न केल्यास यापुढे अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही हरित लवादामध्ये (ए.जी.टी) मध्ये याचिका दाखल करून न्याय मागू. सर्व आंदोलकांना पर्यावरण व नदी प्रदूषणाची शपथ जोगदंड यांनी दिली.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा पाण्यात उभे राहून जन गण मन हे राष्ट्रगीताचे गायन केले.

यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड ,संस्थाध्यक्ष विकास कुचेकर,सचिव रवी भेंकी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, शहराध्यक्षा मीना करंजावणे, , प्रहारचे जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष अँड अनंत काळे,गजानन धाराशिवकर,पंडित वनस्कर, शामराव सरकाळे,काळूराम लांडगे, बबन मगर, बाळासाहेब साळुंके, प्रकाश वीर, पाडूरंग नाडे, दशरथ कांबळे, तुकाराम इंगळे, बाबासाहेब पवार, नितीन गंगावणे, विनायक चव्हाण, अक्षय सोळुंके, पोलीस निरीक्षक जोंधळे बी.एम.उमेश ढोने सह अनेक सामाजिक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button