breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

वीज दरवाढी विरोधात ग्राहक संघटना आक्रमक

पुणे : राज्य वीज आयोगाने वीज ग्राहकांना दरवाढीचा फटका दिला आहे. त्यामुळे ग्राहक संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. महावितरण कंपनीच्यावतीने टक्के इतक्या विक्रमी वीज दरवाढीची मागणी करण्यात आल्याने, राज्यातील वीज ग्राहक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

राज्य वीज आयोगाने केलेली दरवाढ ही बेकायदेशीर असून त्याविरोधात दाद मागण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे. या दरवाढीचे सर्वच वर्गावर विपरीत परिणाम होतील. तसेच ग्राहकांचा उद्रेक होईल अशी परिस्थिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील उद्योगांना रोखण्यात आणि उद्योगांना राज्याबाहेर लावण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणच्या या भरमसाट दरवाढ मागणीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व वीज ग्राहक व विविध औद्योगिक, शेतकरी, रहिवासी व ग्राहक संघटनांनी विरोध करावा आणि प्रचंड प्रमाणात हरकती नोंदवाव्यात, असंही प्रताप होगाडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button