breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

राहुल गांधींचं ‘भारत जोडो’, तर गोव्यात भाजपचं ‘काँग्रेस तोडो’…

  • गोव्यात काँग्रेसच्या आठ आमदारांच्या हाती कमळ
  • गोव्यात काँग्रेसमध्ये धमाका
  • ८ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, राहुल गांधींना धक्का

पणजी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातल्या जनतेला साद घालून केंद्रातील नरेंद्र मोदी यांना सत्तेवरुन खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना आज मोठा धक्का बसला आहे. कारण गोव्यातल्या काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोवा काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षाच्या ८ आमदारांना कमळाची भुरळ पडली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि मायकल लोबो, जे निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, त्यांनीही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याचं आमदार मायकल लोबो यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशभरातल्या काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण असताना दुसरीकडे मात्र गोव्यात काँग्रेसला जबर हादरा बसलाय. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलिला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे. आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसकडे केवळ तीन आमदार उरले आहेत. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सर्व आमदारांचं पक्षात स्वागत केलं. यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सगळ्या आमदारांचं अभिनंदन करताना भारत जोडो यात्रा नाही तर काँग्रेस छोडो यात्रा सुरु झालीये, असा टोमणाही मारला. ‘सामर्थ्यशाली गोवा घडविण्यासाठी आपण भाजपमध्ये आलात, मी तुमचं मनापासून स्वागत करतो’, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? आतापर्यंतची सर्वांत मोठी माहिती समोर
गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी फेब्रुवारीमध्ये निवडणूक झाली. एनडीएकडे २५ आमदार असून काँग्रेसचे ११ आमदार होते, आता ८ आमदारांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसकडे तीनच आमदार बाकी आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग होता. २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या, परंतु १३ जागा असूनही भाजपला आघाडीचे सरकार स्थापन करण्यात यश आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button