breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचं समन्स

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायलयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. नागपूर पोलिसांनी काल (गुरुवारी) फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवलं.

या प्रकरणाबाबत खुलासा न केल्याच्या आरोपाखाली दंडाधिकारी न्यायालयाकडे एक नोव्हेंबरला फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज दाखल झाला होता. वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरु करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.

एकीकडे महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालेलं असतानाच योगायोगाने त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरी समन्स धडकलं.

ANI✔@ANI

Nagpur(Sadar)Police Inspector Mahesh Bansode: Nagpur (Sadar) police delivered to ex-Maharashtra CM Devendra Fadnavis, summons issued by a local court in connection with case wherein he is accused of concealing information about 2 criminal matters against him,in election affidavit

View image on Twitter

1,0098:39 AM – Nov 29, 2019Twitter Ads info and privacy325 people are talking about this

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button