breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रहिताच्या कार्यासाठी युवकांनी एकत्रित येणे गरजेचे – आमदार महेश लांडगे

पिंपरी / महाईन्यूज

स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने शहरात ठिकठिकाणी शहराध्यक्ष आमदार पै. महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भोसरी चऱ्होली मंडल, निगडी चिखली मंडल, सांगवी काळेवाडी मंडल, चिंचवड स्टेशन, प्राधिकरण मंडल, पिंपरी दापोडी मंडल व चिंचवड किवळे मंडल येथे युवा पुरस्काराचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच, युवा दिनी १०० युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

तसेच यावेळेस सोशियल मिडियाचे शहराचे संयोजक विक्रांत गंगावणे व भोसरी चऱ्होली मंडलाचे अध्यक्ष उदय गायकवाड यांच्यातर्फे कार्यकारिणी घोषित करण्यात आली. सोशियल मीडिया मध्ये यावेळी युवती व आय टी च्या युवकांना संधी देण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष आमदार पै महेश लांडगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडेजी, विज्ञान भारतीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रमुख पाहुणे व वक्ते मुकुंद देशपांडे जी, प्रदेश सदस्य व सहसंपर्कप्रमुख संकेत खरपुडे, नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, महिला मोर्चाच्या सुप्रिया पाटिल, राजेश पाटिल यांची उपस्थिती लाभली.

पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, राजेंद्र ढवाण, तेजस्विनी कदम, गणेश जवळकर, दिपक नागरगोजे, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, हेमंत देवकुळे, शिवराज लांडगे, राहुल खाडे, पंकज शर्मा, पुजा आल्हाट, मंडल अध्यक्ष सन्नी बारणे, देवीदास तांबे, सुमीत घाटे, उदय गायकवाड, अनुसुचीत जाती जमाती आघाडीचे सचिन उदागे, केवल जगताप, ओबीसीचे किशोर लोंढे, व्यापारी विभागाचे राजेश राजपुरोहित, युवती विभागाचे अर्पिता कुलकर्णी, विद्यार्थी विभागाचे उपाध्यक्ष अनिकेत शेलार, अथर्व कुलकर्णी, तेजस मुळे, रूबेन सन्नी तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button