breaking-newsआंतरराष्टीय

मलेशिया : 92 वर्षीय महाथिर यांनी सूत्रे स्वीकारली

क्वाललांपुर – मलेशियाचे नवे पंतप्रधान म्हणून महाथिर महंमद यांनी आज आपली सूत्रे स्वीकारली. 92 वर्षीय महाथिर हे जगातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्रप्रमुख ठरले आहेत. त्यांनी आश्‍चर्यकारकरित्या निवडणूका जिंकून सहा दशकांनंतर त्यांनी विरोधी पक्षांची सत्ता प्रस्थपित केली आहे. मलेशियाला 1957 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेथे बरिसन नॅशनल कोऍलिकशनचे सरकार अस्तित्वात होते. त्यानंतर प्रथमच या आघाडीला आपली सत्ता सोडावी लागत आहे. मलेशियाचे विद्यमान पंतप्रधान नजीब रज्जाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. त्यानंतर महाथिर महंमद यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात उतरून त्यांचा पाडाव केला.

महाथिर महंमद यांनी या आधी 22 वर्षे मलेशियाचे राष्ट्रप्रमुखपद सांभाळले होते.आज झालेल्या एका दिमाखदार सोहोळ्यात राजे सुलतान महंमद व्ही यांनी महाथिर यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. त्यांनी शपथ घेतात देशभर सर्वत्र मोठी आतषबाजी करून त्यांचा हा विजय साजरा करण्यात आला. महाथिर महंमद यांनी सूत्रे स्वीकारतात आपले राजकीय मित्र व प्रमुख विरोधी पक्ष नेते अन्वर इब्राहीम यांची तुरूंगातून सुटका करण्याची घोषणा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button