breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेही कोरोनामुक्त

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तटकरे यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. २७ ऑक्टोबरला सुनील तटकरेंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली होती.

“मला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला असून काही दिवस मी विलगीकरणात राहणार आहे. आपल्या शुभेच्छांमुळे प्रकृती उत्तम असून या काळात माझी काळजी घेणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. या कोविड योद्ध्यांच्या सेवावृत्तीला व कार्याला माझा सलाम!” असं ट्वीट खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button