breaking-newsराष्ट्रिय

दहशतवादी हल्ल्याचा मोठा डाव उधळला

चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा 
श्रीनगर – जम्मू काश्‍मीरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा डाव सुरक्षा दलाने उधळून लावला असून या दलाच्या जवानानंबरोबर झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. श्रीनगर शहराच्या बाहेरील छत्ताबल भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्‍मीर पोलिस व सीआरपीएफच्या पोलिसांनी संयुक्तपणे एक मोहीम हाती घेऊन या इमारतीला वेढा दिला.

आतील दहशतवाद्यांना याची कल्पना आल्यानंतर त्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण नंतर या तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. ही चकमक चार तास चालली. त्यात चार सुरक्षा जवानही किरकोळ जखमी झाले. पण त्यांची प्रकृती धोक्‍याच्या बाहेर आहे असे सांगण्यात येते. या कारवाईच्यावेळी आसपास राहणाऱ्या नागरीकांना कोणतीही झळ पोहचू नये याची पुरेपुर काळजी घेण्यात आली होती.

ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यातील एक दहशतवादी स्थानिक असल्याची माहिती मिळाली असून अन्य दोघे जण पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक कयास आहे. या दहशतवाद्यांचा 7 मे रोजी दहशतवादी हल्ला करण्याचा प्लॅन होता अशीही माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button