breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार उदयनराजे भोसले जेव्‍हा तृतीयपंथीयांच्या कार्यक्रमात सहभागी होतात…

पुणे –छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या दबंग स्वभावामुळे ओळखले जाते. त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. तरीही उदयनराजेंची प्रचंड लोकप्रियता आहे. परंतु या वेळी उदयनराजेंनी फ्रेंडशिप डे अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी तृतीयपंथीयांच्या कार्यक्रमात सहभागी होत त्यांच्यासोबत फोटोसेशनही केले. तसेच तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणार असल्याचे म्हणाले.
उदयनराजे काय म्हणाले?
– खासदार उदयनराजे म्हणाले की, आपण सर्वांनी राष्ट्रगीत गायलेले आहे. राष्ट्रगीताच्या एका शब्दाचे अनुकरण जरूर केले पाहिजे.
– ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीने तृतीयपंथीयांनाही अधिकार आहे.
– आपण जर तृतीयपंथीयांनाही समाजात स्थान दिले नाही, तर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये फरकच काय राहील?
– परमेश्वराने आपल्याला इतर प्राणिमात्रांमपेक्षा जास्त बौद्धिक क्षमता दिली आहे, म्हणूनच आपल्याला माणूस म्हणून ओळखले जाते.
– तृतीयपंथींच्या भल्यासाठी जी कामे करावी लागतील, त्यासाठी मी उभा आहे.
 जनतेला कधीच मते मागायला गेले नाहीत
– उदयनराजे सर्व जनतेत लोकप्रिय आहेत. आजही जनता त्यांना राजाच मानते.
– म्हणूनच म्हटले जाते की, निवडणुकीदरम्यान कधीही ते जनतेला मते मागायला गेले नाहीत. तर जनता स्वत:हून त्यांच्याजवळ येऊन त्यांना समर्थन देते.
– त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाजा या एकाच प्रसंगातून येईल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानाही त्यांचा 5 लाखांहून अधिक मतांनी विजय झाला. याआधी 2009 मध्येही ते 3 लाखांहून अधिक मतांनी त्यांनी निवडणूक जिंकली होती.
– त्या आपल्या रयतेलाच आपले कुटुंब मानतात आणि नेहमीच लहान-मोठ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button