breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

राष्ट्रवादीचे नेते रमेशचंद्र तवरावाला यांचे कोरोनाने निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जालना जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला यांचे संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. काही दिवसांपूर्वी तवरावाला यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रथम त्यांना जालना येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना संभाजीनगर येथील धुत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. सुरुवातीस त्यांची प्रकृती स्थीर होती. परंतु नंतर त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही आणि मंगळवारी सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजेश टोपे या पोस्टमध्ये म्हणतात, ‘टोपे परिवाराचे व रामेशसेठ तवरवाला याचे अत्यंत स्नेहाचे आणि कौटुंबिक सबंध होते. माझे वडील कर्मयोगी अंकुशराव टोपे यांचे ते जिल्ह्यातील एक अत्यंत विश्वासू सहकारी होते. प्रकृतीच्या कारणामुळे टोपे साहेब यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राजीनामा दिला त्यावेळी सुद्धा साहेबांच्या नंतर साहेबांचे जिल्ह्यातील एक विश्वासू सहकारी म्हणून मी त्यांना बँकेचे अध्यक्ष केले. जालना जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात रमेशचंद्र तवरावाला यांनी भरीव कार्य केले आहे.

जालना शहरातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जेपीसी बॅंकेचे चेअरमन पद त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळले असून जालना जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपदावर देखील ते गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. जालना शहर व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या हितासाठी नेहमीच संघर्षाची भूमिका घेऊन व्यापाऱ्यांना पाठबळ देण्याचे काम श्री तवरावाला यांनी केलेले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच आपणांस अत्यंत दुःख झाले. संपूर्ण जालना शहर व जिल्ह्यात शोककळा पसरली. मी व माझा संपूर्ण परिवार त्यांचे कुटुंबीयांचे दुःखात सहभागी आहोत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील संपूर्ण जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ईश्वर त्यांचे आत्म्यास चिरशांती देवो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button