breaking-newsपिंपरी / चिंचवड

डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना क्वारन्टाईन तर कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी हे संपर्कात होते त्याना रुग्णालयीन प्रशासनाने इतर कुणाच्याही संपर्कात न येता खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे.

रुग्णावर शस्त्रक्रिया करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोन दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टर्स व रुग्णालयीन स्टाफला क्वारन्टाईन करण्यात आले असून त्याचे सॅम्पल करोनाच्या तपासणी करता प्रयोगशाळेकडे पाठवले.
याबाबत अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांनी माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button