breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राम शिंदे पुण्यात उदयनराजेंच्या भेटीला, धनगर आरक्षणावर चर्चा

पुणे | भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर पुण्यात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आरक्षणाच्या प्रश्नातही उदयनराजे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती राम शिंदे यांनी यावेळी केली. माध्यमांना टाळत उदयनराजे यांनी राम शिंदेंना भेट दिली.

‘धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काल (शनिवारी) माझी नियोजित बैठक खासदार छत्रपती उदयनराजे महाराज यांच्यासोबत झाली. रात्री त्यांना भेटलो, तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विस्तृत आणि तपशीलवार चर्चा झाली’ अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.

‘धनगर समाजाचा लढा अनेक दिवस चालू आहे. समाजाला आरक्षण मिळत नाहीये. घटनेमध्ये तरतूद आहे, अशा अनेक गोष्टींवर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. उदयनराजेंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपल्या लढ्याला माझा पाठिंबा असल्याचं आश्वासित केल्याचं राम शिंदेंनी सांगितलं. ‘मला धनगर समाजाविषयी माहिती आहे, त्यामुळे धनगर समजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली’ अशी माहितीही राम शिंदे यांनी दिली.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजे यांनी या राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं. सर्व पीडित आणि वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेतली. म्हणून मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना सकारात्मक भूमिका घेतली आहे’ असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

भविष्यात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहे. हा लढा सर्वंकष व्हावा, कोणत्याही व्यक्तीचा किंवा पक्षाचा लढा न राहता समाजाचा लढा व्हावा, अशी भूमिका आपण पुढील काळात घेणार असल्याचंही राम शिंदे यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button