ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात आज रात्रीच्या वेळी 9.4 मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज

पिंपरी चिंचवड | आज पुण्यात दिवसाचं सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे. पाऊस पडल्यानंतर तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दिवसा 38 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर वाऱ्यात आर्द्रतेचं प्रमाण हे 61 टक्के आहे.दिवसभरात पावसाच्या एक किंवा दोन सरी कोसळण्याची शक्यता आहे. दिवसभरात 2.8 मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रात्री तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकतं. रात्रीच्या वेळी 9.4 मिमीपर्यंत पाऊस पडण्याच्या अंदाज आहे.

पुण्यात मागचे अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतण्याची चिन्हं आहेत. हवामान विभागाने आजपासून पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यात पुणे आणि परिसरातही अनेक भागात पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर अनेक भागात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर गेल्या आठवड्यात तापमानात अचानक वाढ झाली होती. दिवसाचं सरासरी तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं होतं. दिवसा उन्हाचा चटका जाणवत होता तर रात्रीचं सरासरी तापमानही काहीसं वाढल्याचं जाणवत होतं. पण काल आणि आज अनेक भागात सूर्याचं दर्शन झालेलं नाही. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button