breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

राम मंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषावर निर्बंध, अहमदनगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा

अहमदनगर: अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पक्ष आणि संघटनांना कलम 149 अंतर्गत नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. अहमदनगरला मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनाही नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. यात उद्या होणाऱ्या जल्लोषावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

मनसेने फटाक्याची आतषबाजी करत आपला आनंद साजरा करणार असल्याचे जाहीर केलेले होते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आजपासून विविध संघटनांच्या पदाधिकारी यांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. जर या नोटिसांचे पालन न केल्यास कार्यकर्त्यांवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.

या नोटीशीत कुठल्याही प्रकारचे जल्लोष, विजय मिरवणूक, फटाक्यांची आतीषबाजी, घोषणाबाजी, शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड लावणे या व्यतिरिक्त भूमिपूजनाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर होमहवन, सामूहिक पूजा, नमाज पठण हे कुठलेही कृत्य करु नयेत. त्यासंबंधित सोशल मीडियावर विशिष्ट फोटो अथवा मजकूर शेअर करेल, जेणेकरुन दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाची कुठलेही कृत्य करू नये, असे यात नमूद करण्यात आलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button