breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

बापरे! पर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट ‘वाशी टू लोणावळा’ रिक्षाने प्रवास, सात जणांना अटक

लोणावळा: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातलेली असताना देखील अनेक पर्यटक हे लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येत आहेत. लोणावळा शहर पोलिसांकडून येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई सुरुच आहे. या कारवाईतून वाचण्यासाठी पर्यटक अनेक शक्कल लढवताना पाहायला मिळत आहेत. आपण पर्यटनसाठी आलो हे कुणालाही समजू न देण्यासाठी काल (3 ऑगस्ट) नवी मुंबईतील वाशी येथून दोन रिक्षामध्ये सात पर्यटक लोणावळ्यात पोहोचलेले होते.

लोणावळ्यातील गोल्ड व्हॅलीमधील माऊंट कॉटेज या बंगल्यात या लोकांनी नजरचुकवून प्रवेश मिळवला आणि पार्टी करण्यास सुरुवात केलेली होती. या मद्यप्रेमींनी जोरदार पार्टी सुरु केलेली होती. त्याचवेळी बाहेर लोणावळा पोलिसांची रात्रगस्त सुरु होती. पोलिसांना या बंगल्याच्या बाहेर दोन रिक्षा आढळून आलेल्या होत्या. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता एम एच – 43 अर्थात मुंबईच्या वाशीतील रिक्षा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. बंगल्याच्या आत पार्टी करणाऱ्यांना बाहेर पोलीस आल्याची माहिती देखीलही नव्हती. ते आपल्या पार्टीमध्ये दंग होते.

या पार्टीमध्ये पोलिसांनी एन्ट्री करताच पार्टी करणाऱ्यांचे धाबे दणाणले. या पर्यटकांकडून माहिती घेतली असता ते नवी मुंबईतील वाशी येथून पर्यटनासाठी आल्याचे निष्पन्न झाले आहे. लोणावळा पोलिसांनी या 7 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, पर्यटन बंदी असताना देखील माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारपासून लोणावळा परिसरात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील पर्यटक लोणावळा येथे सहलीचे आयोजन करत आहेत. लोणावळा सध्या पर्यटनास्थळ म्हणून बंद घोषित करण्यात आलेलं असून कुठल्याही पर्यटकाने लोणावळा परिसरात येऊ नये, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा लोणावळा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button