breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वास नांगरे-पाटील नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयपीएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात विश्वास नांगरे-पाटलांसह अन्य अनेक अधिका-यांचा समावेश आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वास नांगरे-पाटील हे एक बेधडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. खडतर परिस्थितीतून आयपीएस झालेले नांगरे-पाटील हे त्यांच्या कामामुळे महाराष्ट्रातील तरुणांचे आयकॉन ठरले आहेत. त्यांना आतापर्यंत मुंबई, ठाणे, लातूर, अहमदनगर, पुणे व कोल्हापूर येथे काम केल्याचा दांडगा अनुभव आहे. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर(अतिरिक्त) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग, पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र अशा विविध विभागांत त्यांनी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.

नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकचे आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. याबाबत मंत्रालयातून बदलीचा आदेशही जारी करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button